सर्वोत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल राज्यात द्वितीय पारितोषिक देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान.

कर्जत,दि.५ जुन(प्रतिनिधी) : पंचतत्वाचे संवर्धन व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या “माझी वसुंधरा अभियान 2020-21 अंतर्गत अहमदनगर जिल्हयाने राज्यात घवघशीत यश संपादीत केल्याबद्दल मिरजगांव ग्रामपंचायत चा  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,महसुलमंत्री बाळासाहेब थोरात,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री अदित्य ठाकरे,राज्यमंत्री संजय बन्सोड, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा पाटणकर-म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
राज्याच्या पर्यावरण व वातावणीय विभागाच्यावतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत सन 2020-21 मध्ये भुमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारीत पाच गटात स्पर्धा पार पाडली. महाराष्ट्र राज्यातून 291 ग्रामपंचायतीच्या गटातून अहमदनगर जिल्हयातील मिरजगांव,ता.कर्जत या ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक पुरस्कार जाहिर करण्यात आला. हा पुरस्कार ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री श्री.हसन मुश्रीफ यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी गटविकास अधिकारी अमोल जाधव, ग्रामविकास अधिकारी प्रताब साबळे, सरपंच सुनीता खेतमाळस, मंडळ अधिकारी मोहसीन शेख,श्री.आबासाहेब वीरपाटील, ग्रा.प.सदस्य नितीन खेतमाळस,ग्रा.प.सदस्य सागर पवळ, सलीम आतार,ग्रा.प. वरिष्ठ कर्मचारी निशांत घोडके,आशिष निंबोरे, ग्रामसेवक किरण जवणे,भगवान घोडके,क्षीरसागर आण्णा ,तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मिरजगांव ग्रामपंचायत चे वरिष्ठ लिपिक निशांत घोडके  यांनी माझी वसुंधरा स्पर्धेसाठी विशेष परिश्रम घेतल्याबदल राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हापरिषद अहमदनगर यांनी पत्र पाठवून निशांत चे  अभिनंदन केले आहे.