कर्जत, दि.६ जुन (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील तालुक्यातील मांदळी येथे आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायत ने तयार केलेल्या यादीनुसार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एकूण 20 नागरिकांना कोरोना लस यावेळी देण्यात आली तसेच 30 नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यादीत असलेल्या 20 नागरिकांना लसीकरणा बाबतची माहिती आदल्या दिवशी ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आली होती, त्यानुसार दुसऱ्या दिवशी नागरिकांनी हजर राहून लसीकरण करून घेतले. 

यावेळी सरपंच शामली वाघ, उपसरपंच धनेश गांगर्डे, ग्रामसेवक शरद कवडे,ग्रामपंचायत सदस्य अलका गांगर्डे, सुधीर बचाटे, सिंधू गांगर्डे,किरण गांगर्डे, अनिता भुजबळ तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.