महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा - MHT-CET 2021

परीक्षेचे नाव : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2021

अभ्यासक्रम :

1. तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D)

2. कृषी अभ्यासक्रम

3. मत्स्यव्यवसाय विज्ञान / दुग्धशाळा तंत्रज्ञान (Fisheries Science/Dairy Technology courses)

शैक्षणिक पात्रता : 12 वी (विज्ञान), प्रविष्ट, उत्तीर्ण/पात्र किंवा समतुल्य.

वयाची अट : वयाची अट नाही.

फी : General - ₹ 800

SC,ST,VJ/DT-NT(A),NT(B),NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS - ₹ 600

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट : लिंक


ऑनलाईन अर्ज : लिंक


एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी पुर्वापेक्षित अट

▪️एमएचटी सीईटी २०२१ ऑनलाईन परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एच.एस.सी. किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा १२वी/समकक्ष परीक्षा दिलेली असावी.

▫️संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग / सामाजिक व आर्थिक मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.

▫️एमएचटी सीईटी २०२१ शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.८००/-

▪️महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग / सामाजिक व आर्थिक मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग / महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग उमेदवार) रु. ६००/-

▪️ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे. एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.

▫️ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.