कर्जत (प्रतिनिधी) : अहमदनगर - करमाळा NH-516A राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन प्रक्रियेचा आढावा कर्जत येथे पंचायत समिती कार्यालय मध्ये खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतला. कर्जत मधील आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी भूसंपादन प्रक्रिया ही 15 ऑगस्ट पर्यंत करून घेण्याची सूचना खासदार विखे यांनी केली. तसेच तोपर्यंत या महामार्गावर प्रवाशांचा मार्ग सुखकर करण्यासाठी खा. विखे यांनी या मार्गावर असणारे खड्डे तसेच अनेक ठिकाणी अस्तरीकरण व दुरुस्ती साठी आठ कोटी रुपये केंद्र सरकार कडून मंजूर करून काम सुरु झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ,प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत, प्रांताधिकारी अर्चना नस्टे, राष्ट्रीय महामार्गाचे दिवाण, तहसीलदार नानासाहेब आगळे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे, दादासाहेब सोनमाळी, सुनील यादव, पप्पूशेठ धोदाड, शेखर खरमरे आदी उपस्थित होते.


