धाडसी डॉक्टर आणि ग्रामस्थांचा पोलीस निरीक्षक यांनी केला सन्मान.

कर्जत (प्रतिनिधी) : तालुक्यातील मिरजगाव येथे दिनांक ६ जुलै २०२१ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टर संजयकुमार कोल्हे, रा. मिरजगाव यांच्या पत्नी शिक्षिका असल्याने सकाळी आठ वाजताच शाळेत निघून गेल्या होत्या तर डॉक्टर जवळच असलेल्या आपल्या दवाखान्यात गेले होते. घरी असलेले वडील सकाळी नऊच्या सुमारास कुलूप लावून जवळच असलेल्या मंदिरात दर्शनासाठी निघून गेले होते.

थोड्या वेळाने डॉक्टर पाणी घेण्यासाठी घरी आले असता त्यांना दरवाजा उघडा तर कडी कोयडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात पाहिले असता अनोळखी व्यक्ती घरातील कपाटात उचकापाचक करत होता, हे पाहून डॉक्टर बाहेर जाऊन दरवाजा लावत असताना चोराने दरवाजाला जोरात धक्का देऊन पळ काढला. यावेळी डॉक्टरांनी चोर पळाला असा आरडाओरडा केला व कर्जत पोलिसांना तात्काळ कळविले.  त्यावेळी जवळच उभे असणारे व रस्त्याने जाणारे शिवाजी शहाजी गायकवाड, सोमनाााथ बाबासाहेब पठारे, अभिजीत रामदास राहिंज, गणेश नारायणे, नितीन म्हेत्रे ,संतोष कोरडे, रमेश घोडके व इतर नागरिक यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. सदर आरोपी अज्ञात ठिकाणी जाऊन लपला. ग्रामस्थ आणि पोलिसांनी त्याचा माग काढत मोठ्या शिताफीने त्यास पकडले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता अंकुश लक्ष्मण लष्करे, रा.केडगाव, ता.जि. अहमदनगर असे सांगितले. त्याच्यावर पुणे आणि परिसरात घरफोडीचे जवळपास 48 गुन्हे दाखल आहेत. चोराचा दुसरा जोडीदार बाहेर टेहाळणी करत त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुरज बबन विटकर, रा.जलालपूर, ता. कर्जत असल्याचे सांगून मुख्य आरोपीचे सोबत असल्याचे सांगितले.

Adv.


मिरजगाव येथील नागरिकांनी चोर पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली म्हणून कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी येथील मिराजगाव डॉक्टर आणि नागरिकांचा सन्मान व सत्कार केला. 

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक यादव म्हणाले पोलीस आणि नागरिकांमध्ये सहकार्याची भावना असलीच पाहिजे. असा काही प्रकार असल्यास तात्काळ पोलिसांना कळविले पाहिजे. अशा वेळी ग्राम सुरक्षा यंत्रनेचा प्रभावी वापर होऊ शकतो, अशा तात्काळ कॉल दिला पाहिजे. आरोपी पकडल्यास त्याला मारहाण करू नये..

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, कर्जत पोलिस स्टेशन , पोउपनी अमरजीत माने, अंमलदार श्री प्रबोध हंचे, बबन दहिफळे, गणेश काळाने, रवी वाघ, जितेंद्र सरोदे, महादेव कोहक यांनी केली.