कर्जत (प्रतिनिधी) : दिनांक 28 जुलै रोजी रात्री 10/00 वाजताच्या सुमारास एक मुलगा हातात दाढी करण्याचे ब्लेड घेऊन अंगावर वार करुन पोलीस स्टेशनला आला. त्याचे नाव रोहित दीपक काळे, राहणार शिंदा, तालुका कर्जत. सोबत त्याचा चुलत भाऊ सोमनाथ काळे हा होता. दीपक काळे पोलिसांना म्हणाला की माझी बायको शंभू हिला माझा सासरा पितांबर हा सातारा येथे घेऊन गेला आहे. माझी बायको आत्ताच आणून द्या नाहीतर मी माझा गळा तुमच्यासमोर कापून घेईल व त्याच्या हातातील ब्लेड त्याने गळ्याला लावले. त्यावेळी पोलिसांनी त्याची समजूत काढून तुझी बायको आणून देतो असे सांगू लागले. परंतु तो धमकी देऊ लागला व मी आत्महत्या करील असे म्हणू लागला. त्यावेळी त्याचा चुलत भाऊ सोमनाथ हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता आणि बोलत होता. ठाणे अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रबोध हंचे यांनी सासर्याच्या फोनवर पोलीस स्टेशनच्या फोन वरून फोन केला व त्याची पत्नी चे मुलीला फोनवर बोलून गुंतवून ठेवले. त्या वेळी पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख पोलीस कॉन्स्टेबल गोवर्धन कदम, बळीराम काकडे यांनी झडप घालून रोहित दिपक काळे याचे दोन हात पकडून त्याच्यावर नियंत्रण मिळवले. त्याच्या हातातील ब्लेड काढून घेतले. 

बऱ्याच वेळेस प्रशासनाला विनाकारण वेठीस धरण्यासाठी काही लोक बेकायदेशीर कृत्य करण्याचा प्रयत्न करतात. तसे न करता आपले म्हणणे पोलीस ठाण्यात व्यवस्थित रित्या मांडावे, त्यावर कर्जत पोलीस कारवाई करतील.

              -चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक

 सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, कर्जत पोलिस स्टेशन, सपोनि सुरेश माने, पोलीस अंमलदार श्री प्रबोध हंचे, इरफान शेख, सचिन वारे, गोवर्धन कदम, बळीराम काकडे यांनी केली.