कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरा येथील रहिवासी जयराम शेंडगे यांनी सामाजिक बांधिलकी जपत कन्न्या मनवा हिच्या वाढदिवसानिमीत्त स्नेहप्रेम अनाथालयाला १०००० रुपये चे साहित्य भेट दिले आहे. बरेच पालक आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करताना अवाजवी खर्च करतात परंतु शेंडगे यांनी या खर्चाला फाटा देत, अतिरीक्त खर्च टाळुन स्नेहप्रेम या अनाथालया मधे मुलांना जेवन तसेच वह्या, व्हाइट बोर्ड, वायफाय राऊटर, व इतर शालेय साहित्यासोबत ऑनलाईन शाळेसाठी असे एकुन १०००० रुपयांचे साहित्त्य भेट दिले. या वेळी वडगाव तनपुराचे सरपंच निलेश तनपुरे,उप सरपंच सचिन शेंडगे, सुमित तनपुरे आदि हजर होते.