कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील मुळेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष मुळे यांनी वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत वाढदिवस साजरा केला आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अतिरिक्त खर्च टाळून मेघेश्वर गडावर वृक्षारोपण केले आहे. यामध्ये त्यांनी चिंचेच्या रोपट्यांचे रोपण केले आहे. मेघेश्वर गडावरील झाडांसाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी मुळेवाडी, कौडाणे, कोंभळी येथील निसर्गप्रेमींच्या सहकार्याने पाण्याच्या टाकीचे नियोजन करण्यात येणार असल्याचे वृक्षारोपण कार्यक्रमात सांगण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संतोष मुळे यांचा मित्रपरिवार सामाजिक बांधिलकी जपत असेच सामाजिक उपक्रम राबवित असतो . या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी ग्रामसेवक जालिंदर मुळे, ग्रामपंचायत सदस्य डॉ सुनिल मुळे,सतिष जगताप, प्रकाश मुळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक सूर्यवंशी, माजी सरपंच धनराज सुद्रीक,हनुमंत सुद्रीक, रुपचंद गांगर्डे, प्रा. विशाल मुळे,वायजी इन्फोटेकचे स्वप्नील मुळे,अनिल सुद्रीक,भाऊसाहेब सूर्यवंशी आदी उपस्थित होते.


