कर्जत (प्रतिनिधी) : ऍड कांतीलालजी छाजेड मनमाडकर (वय ७१) यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. अत्यंत विनोदी व  बोलके, सर्वामध्ये मिळून मिसळून राहणारे, कुटुंबातील कोणाचाही कसलाही कार्यक्रम असो निरोप मिळताच उपस्थित राहणारे, कुणाबद्दल ही मनात आकस नसलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून कांतीलालजी छाजेड यांना परिवारात व कर्जत मध्ये त्यांनी अनेकांना आपलंस केले होते.कर्जत येथील पत्रकार आशिष बोरा यांच्या मोठ्या बहिणीचे पती म्हणजे दाजी होते. आशिष बोरा यांच्या लहानपणीच झालेल्या वडिलांचे निधना नंतर त्यांनी आतापर्यंत खूप मोठा आधार दिला होता. मनमाड मध्ये विविध क्षेत्रात ते कांतीभाऊ म्हणून सर्वामध्ये विशेष लोकप्रिय होते, त्याच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, सून  मोठे बंधु, भाउजई, एक मुलगी, जावई, नातू असा मोठा परिवार आहे. मनमाड येथील स्मशानभूमीत त्याचे वर अत्यंसंस्कार करण्यात आले. अमरचंद छाजेड यांचे ते लहान बंधू तर सचिन छाजेड यांचे वडील होते. त्याच्या निधनानंतर कर्जत येथे बोरा यांच्या कुटुंबियाकडे जैन स्थानक येथे उठावणा  झाला.