कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत शहरातील  परवानाधारक वाईन शॉप राज्य उत्पादन शुल्क कडून सील केल्याची माहिती मिळते आहे.

कर्जत शहरातील मध्यवर्ती भागात असलेले परवाना धारक दारूदुकान राज्य उत्पादन शुल्क कडून काही दिवसांपूर्वी सील करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग स्वतंत्र असल्याचे त्याचे कडून सांगितले जात आहे.  कर्जत मधील हे परवाना धारक दारू दुकान कशामुळे सील करण्यात आले याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सदरील विभागाचे पोलीस अधीक्षक गणेश पाटील यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे याबाबत संदिग्धता असून सदरील कारवाईत माहिती न देण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.