कर्जत (प्रतिनिधी) : आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्या नियोजनातून आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी शंभर लोकांचे लसीकरण करण्यात आले.
आर टी पीसीआर तपासणी करून अठरा वर्षाच्या पुढील महिला व पुरुष यांना टोकन पद्धतीने लस देण्यात आली.
राज्यात कोरोना विषाणूची तिसरीला लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने कोरोन रुग्ण वाढू नये, तसेच नवीन रूप धारण करणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खूप मोठी मदत होईल त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी जास्तीत जास्त प्रमाणात लस घ्यावी असे अहवान अशोक जायभाय यांनी केले यांनी केले.
यावेळी उपसरपंच पप्पू शेख, अजिनाथ जायभाय, सुरेश वाबळे, राजेंद्र निंबाळकर, संतोष आढाव, सागर डाळिंबे, बाळासाहेब बिनवडे, किरण भगत, गणेश निंबाळकर तलाठी अविनाश रोडगे, कृषी सहाय्यक डमरे साहेब, नंदकुमार गोडसे व आरोग्य विभागातील डॉ. सुभाष शिंदे, आरोग्य सहाय्यक बचाटे एस ए, आरोग्य सेविका लहाने मीरा, काळूशे मॅडम, नाजिया पठाण, आरोग्य सेवक रावसाहेव गंगावणे, संजय भैलूमे, वजीर सय्यद, आशासेविका माधुरी भगत,कंठाले बेबीनंदा, विमल सोलंकर, अंगणवाडी सेविका मनीषा चोरगे,सुप्रिय कुलकर्णी,सुनीता केंदळे, ग्रामपंचायत कर्मचारी महादेव जायभाय, शब्बीर शेख, दादा भगत व ग्रामस्थ उपस्थित होते. सहकार्याबद्दल आरोग्य विभागाने ग्रामस्थांचे आभार मानले.


