नवरदेवाचे मित्र चांगले नाहीत म्हणत नवरीने दिला लग्नास नकार.

श्रीगोंदा (प्रतिनिधी) :  तालुक्यातील एका वरासाठी त्याचे मित्रच विघ्न ठरले आहेत. काष्टी येथील आलिशान हॉटेलमध्ये पै पाहुण्यांच्या उपस्थितीत दिमाखात साखरपुडा पार पडल्यानंतर, मुलीनं एक  अजब कारण सांगत लग्नास नकार दिला. त्यामुळे श्रीगोंद्यातील नवरदेवाला रिकाम्या हाती परत यावं लागलं आहे. नवरीचं लग्न मोडण्याचं कारण ऐकून पाहुणेही हैराण झाले होते. साखरपुडा झाल्यानंतर हळदी समारंभाची तयारी सुरू असताना, नववधूनं लग्नाला नकार दिला. त्यामुळे विवाहस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. वराचे मित्रच चांगले नाहीत असे कारण देत वधूने लग्नास नकार दिला आहे.

लग्नाचा बॅंडबाजा वाजत होता. दोन्ही बाजूंचे नातेवाईक मोठ्या आनंदानं  लग्नाला उपस्थित राहिले होते. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. साखरपुडा उरकल्यानंतर हळदी समारंभाची तयारी सुरू असताना, वराचे मित्र चांगले नाहीत, असं कारण देत नवऱ्या मुलीनं चक्क लग्नाला नकार दिला. त्यामुळे श्रीगोंदा येथील रहिवासी असणारा नवरदेव रिकाम्या हाती परतला आहे. नवरदेवासाठी त्याचे मित्रच लग्नातील विघ्न ठरले आहेत.

वधू-वरांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीनं काष्टी याठिकाणी एका आलिशान हॉटेलमध्ये दोघांच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोना विषाणूच्या आचारसंहितेमुळे साखरपुडा, हळदी आणि लग्न या तिन्ही समारंभाचं एकाच दिवशी आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान शुक्रवारी साखरपुड्याचा शाही कार्यक्रम झाला. हळदी समारंभाचीही तयारी करण्यात येत होती.

वराचे मित्र चांगले नाहीत असं कारण देत वधूनं चक्क लग्न मोडलं आहे. सुख दुःखात साथ देणारे मित्र तरुणासाठी विघ्न ठरले आहेत. त्यामुळे नवरदेवाला वधूशिवाय वऱ्हाड्यांना घेऊन रिकाम्या हाती परत जावं लागलं आहे.