कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील घुमरी ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. घुमरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रमोद अनभुले यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक कालावधीत ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाकरिता प्रमोद अशोक अनभुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड होताच नवनिर्वाचित उपसरपंच प्रमोद अनभुले यांचा सत्कार माजी उपसरपंच भामाबाई झगडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विद्यमान सरपंच मंडाबाई रमेश अनभुले, युवा नेते वसंत अनभुले तसेच ग्रा.प. सदस्य भाऊसाहेब अनभुले, मंगल दादा पांडुळे, मंडाबाई बापू गाडे, संगिता संजय अनभुले, हिराबाई मधुकर निंबाळकर, सावळाराम एकनाथ क्षीरसागर व आण्णासाहेब पांडुळे, संजय अनभुले, विकास गाडे, ज्ञानदेव पांडुळे मंत्री, हरिभाऊ अनभुले, शहाजी गाडे, संभाजी अनभुले, सचिन अनभुले, सतिष चितळे, श्रीहरी पांडुळे, तुळसीराम गाडे, नामदेव पांडुळे, रामदास अनभुले, युवराज अनभुले, पांडुरंग घोरपडे, सुदाम चितळे, संदीप अनभुले, रमेश पांडुळे, मोहन पांडुळे, साहेबराव अनभुले, मोहन अनभुले, भाऊसाहेब अनभुले, ग्रामसेविका गोसावी मॅडम आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते

घुमरी गावात निवडणूक कालावधीमध्ये दिलेल्या सर्व आश्वासनाची तसेच निवडणूक जाहिरनामा मधील सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावू, अशी ग्वाही देते. 

 -  मंडाबाई अनभुले , सरपंच, घुमरी.

 घुमरी गावात पाणीपुरवठा, रस्ते यांच्यासह इतर मुलभूत सुविधा विकासाची कामे होत असून गावचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. 

- वसंत अनभुले, युवा नेते.