कर्जत (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर फसवणूक करणार्यांनी अनेकांचे बोगस फेसबुक अकाउंट बनवून संबंधित लोकांकडून काही निमित्त सांगून पैसे मागितल्याच्या घटना सध्या वाढत आहेत.
अश्या घटनांमुळे डिजिटल इंडियाला सायबर गुन्ह्यांना सामोरे जावे लागत आहे. फेसबुकर हॅकर्सचा उच्छाद वाढला आहे. फेसबुक प्रोफाइल हॅक करून त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या मित्र-मैत्रिणींकडून पैसे मागण्याचे प्रकार वाढले आहेत.
फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून, सायबर भामटेही यावर सक्रिय झाले आहेत. अनेकांचे फेसबुक प्रोफाइल हॅक करून त्यांच्या फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या मित्र-मैत्रिणींकडून पैसे मागण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे वकील, डॉक्टर, पोलिस यांचीही बनावट प्रोफाइल तयार करून पैशांची मागणी केली जात आहे.
आपले फेसबुक खाते लॉक करून ठेवावे जेणेकरून ते मित्रांशिवाय इतर कोणालाही पाहता येणार नाही, फोटो वा इतर माहिती चोरून बनावट खाते तयार करता येणार नाही. ओळखीच्या लोकांशिवाय फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, तसेच फेसबुकवरून कोणी पैसे मागत असल्यास देऊ नका. पैश्याची गरज असणारा आपला मित्र फोन करून पैसे मागू शकतो,फेसबुकवरून नाही.
- चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक
बनावट प्रोफाइल बनल्यास काय कराल.
◆ तुमचे बनावट फेसबुक प्रोफाइल बनवले गेले असल्यास स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर बनावट प्रोफाइल शोधा अथवा मित्रांना लिंक पाठविण्यास सांगा.
◆ त्या प्रोफाइलवर जाऊन उजव्या बाजूला तीन टिंब (...) असतात त्यावर क्लिक करा.
◆ 'फाइंड सपोर्ट ऑर रिपोर्ट प्रोफाइल'या पर्यायावर क्लिक करा.
◆ त्यानंतर 'प्रीटेंडिंग टु बी समवन' हा पर्याय निवडा.
◆ त्यानंतरमी, अ फ्रेन्ड आणि सेलिब्रिटीहे पर्याय दिसतील.
◆ आपलेप्रोफाइल खोटे असल्यास 'मी'(Me)या पर्यायावर क्लिक करा.
◆ काही वेळेतच खोटे अकाउंट बंद होईल.
◆ त्यानंतर आपल्या मूळ प्रोफाइलवर बनावट अकाउंटची माहिती द्या.
अशी ठेवा प्रोफाइल सुरक्षित.
● स्वतःची फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसू नये, यासाठी 'हू कॅन सी युवर फ्रेन्डलिस्ट'मध्ये 'ओनली मी' पर्याय निवडा.
● फोटो, व्हिडीओ कुणीही डाऊनलोड करू नये, यासाठी 'लॉक युवर प्रोफाइल'वर क्लिक करा.
● अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नये यासाठी 'हू कॅन सेंड रिक्वेस्ट' या पर्यायामध्ये जाऊन'फ्रेन्ड्स ऑफ फ्रेन्ड्स'हा पर्याय निवडावा.
● फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी 'सेटिंग्ज'मध्ये जाऊन 'टू फॅक्टर ऑथेंटीकेशन'हा पर्याय निवडावा.
● इ मेल आयडी दिसू नये, यासाठी 'हू कॅन लूक इमेल अॅड्रेस'या पर्यायावर जाऊन 'ओनली मी' हा पर्याय निवडावा.
● मोबाइल क्रमांक कोणाला दिसू नये म्हणून 'हू कॅन लूक फोन नंबर'या पर्यायामध्येही'ओनली मी'हा पर्याय निवडावा.


