कर्जत (प्रतिनिधी): कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील ग्रामविकास यांना मारहाण झाल्याची घटना घडली असून फिर्यादी महादेव सखाराम माने वय-35 वर्षे धंदा-ग्रामसेवक (ग्रामपंचायत निमगाव डाकु ) रा. आंबेवडगाव ता. धारुर जि. बीड ह. रा. गदादेनगर, कर्जत ता. कर्जत जि. अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दि. 15/07/2021 रोजी सकाळी 11/00 वा. चे. सुमारास फिर्यादी हे ग्रामपंचायत कार्यालय निमगाव डाकु येथे कार्यालयात काम करत असताना संजय मद्रास काळे रा. निमगाव डाकु ता. कर्जत याने कार्यालयात येऊन फिर्यादी यांना म्हणाला की, माझ्या आईच्या नावावरील आमचे घराचा मला उतारा काढुन द्या असे म्हणाल्यानंतर फिर्यादी त्याला म्हणालो कि, तुमचे 8 अ चे रजिस्टरला नाव पाहुन तुमचा उतारा काढुन देतो. असे म्हणाले असता त्याने मला शिवीगाळ दमदाटी करून गचांटीला धरुन शर्ट फाडुन फिर्यादी ग्रामविकास अधिकारी यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली व त्यांच्या समोरील रजिस्टर फेकुन देउन कार्यालयीन खुर्च्याची मोडतोड केली करण्यात आली आहे, तसेच सरकारी काम करत असताना फिर्यादी यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. महादेव माने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.


