कर्जत (प्रतिनिधी)  : सध्या सोशल मीडियावर कृषिमित्र भरतीची एक जाहिरात सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे, मात्र या कृषिमित्र भरतीच्या जाहिरातीचा कृषी विभागाशी तिळमात्रही संबंध नसून या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर खात्री करून , जाहिरातीची शहानिशा करूनच अर्ज करावेत असे तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

या जाहितीमध्ये असे नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये विशिष्ट मिशन अंतर्गत पात्रतेच्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषीमित्र निवड ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणार आहे असे म्हंटले आहे. 

कृषिमित्र यांची नेमणूक कृषी विभागामार्फत करण्यात येते व संबंधित ग्रामपंचायत कृषी पदवीधर, कृषी पदविका धारक उमेदवारांचे नामांकन करते, ते प्रस्ताव कृषी विभागामार्फत जिल्हा अधीक्षक यांना पाठवून कृषिमित्र साठी नेमणूक करण्यात येते असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांनी सदर जाहिरातीची शहानिशा करूनच अर्ज करावेत जेणेकरून फसवणूक होणार नाही.