कर्जत (प्रतिनिधी) : श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस कर्जत पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. 

कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की विषारी दारू प्रकरणातील आरोपी महादेव चंदू चव्हाण, राहणार आढळगाव, तालुका श्रीगोंदा हा श्रीगोंदा पोलीस स्टेशन  गुरनं 1430/2021 भा द वि कलम 328 मध्ये फरार आहे व तो कर्जत वरून आढळगाव ला जाणार आहे. लागलीच सपोनि सुरेश माने, पोलीस जवान पांडुरंग भांडवलकर, शाम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम यांना सांगितली पोलीस जवान यांना आरोपी ताब्यात घेणेकामी तातडीने रवाना केले. कर्जत मध्ये कुळधरण चौक येथे सापळा लावून मोठ्या शिताफीने आरोपी महादेव चंदू चव्हाण यास ताब्यात घेतले आणि त्याला श्रीगोंदा पोलीस  ठाण्याचे पोलीस नाईक वैराळ यांच्या ताब्यात देण्यात आले.