कर्जत (प्रतिनिधी): कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी शिवारात गुटखा घेऊन जाणाऱ्या इसमास कर्जत पोलिसांनी ताब्यात घेऊन 3 दिवसांसाठी पोलीस कोठडी दिली आहे. दिनांक 11 /7 /2021 रोजी  पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांना माहिती मिळाली की बिटकेवाडी कर्जत ते श्रीगोंदा जाणारे रोडणे एक स्कुटी मोटासायकल स्वार हिरा गुठका विक्री करणारा हिरा गुटखा घेउन कर्जत कडे येत आहे अशी माहिती मिळाने तात्काळ पोलीस जवान यांना सदर ठिकाणी पाठवून,  पोलिस जवान यांनी सांगितले त्यानुसार  बिटकेवाडी शिवारात  हॉटेल न्यू साई जवळ रोडवर थांबले असता एक स्कुटी गाडी येताना दिसली तीस हात दाखवून थांबण्याचा इशारा  देऊन थांबविले त्या स्कुटी चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव  सय्यद फारुक आमीन वय 19 वर्षे राहणार खडकत तालुका आष्टी जिल्हा बीड असे सांगितले त्यास पांढरे रंगाचे गोणीत काय आहे. असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी पोलीस अंमलदार यांना सदर गोणीचा संशय आल्याने सदर गोणी दोन पंचांसमक्ष पाहणी केली असता त्यात हिरा पान मसाला , टोबॅको तंबाखू चे वेगवेगळे पुढे दिसून आले, त्याचा दोन पंचांसमक्ष पंचनामा केला असता एकूण 5554 रू किमतीचा एम आर पी नुसार  हिरा पान मसाला मिळून आला , तसेच रोख 2300 रू व 25000 रू हिरो कंपनीची पांढरे रंगाची डेस्टिनी 125 मोटासायकल, आस एकुण 32854 रू किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने पोलीस अंमलदार यमगर यांनी दोन पंचांसमक्ष जागीच पंचनामा करून आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेतले 

 सदर इसम, सय्यद फारुक आमीन वय 19 वर्षे राहणार खडकत तालुका आष्टी जिल्हा बीड हा हिरा पान मसाला ,टोबॅको तंबाखू चे वेगवेगळे पुढे , असे मानवी शरीरात सेवन केल्यास ते मानवी आरोग्यास हानिकारक होऊन त्यामुळे मानवाचा मृत्यू होऊ शकतो हे माहीत असून सुद्धा महाराष्ट्र राज्यात अशा प्रकारचे मानवी शरीरास अपायकारक असतील असे पदार्थ विक्री करण्यास किंवा जवळ बाळगण्यास बंदी असताना त्याचे आर्थिक लाभाकरिता स्वतःचे कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने हिरो कंपनीची डेस्टीनी 125 पांढरी रंगाची  बिगर नंबर ची  मो सा .गाडीसह मिळून आला आहे .म्हणून त्याचे विरुद्ध कर्जत पोलिस स्टेशनला भादवि कलम 328 ,188, 272, 273, व अन्न व सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम 26 (2) (iv)27, 30 ,(२)23 प्रमाणे पोलिस आमलदर सुनील खैरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अमलदार सुनील माळीशिखरे हे करत आहेत.

सदरची करवाई कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने , पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर ,भाऊसाहेब यमगर सुनील खैरे, विकास चंदन ,श्याम जाधव ,यांनी केली आहे .