कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील तिखी येथील युवा नेते , ग्रामपंचायत सदस्य तसेच पर्सनल पावर ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष विकास दळवी व उपाध्यक्ष गणेश बेद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
तिखी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात तसेच ग्रामदैवत ओढ्यातील बाबासाहेब येथील जागेत वृक्षारोपण करण्यात आले.
आज वाढदिवस म्हटले की इव्हेंटच होतो,अनेक प्रकाराने तो साजरा केला जातो.पण वृक्षारोपण,रक्तदान शिबीर,गोर-गरीबांना मदत,अनाथाश्रम,वृध्दाश्रम यांना मदत असे सामाजिक उपक्रम केले,तर समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण होतो, त्याच अनुषंगाने विकास दळवी व गणेश बेद्रे यांनी वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत वृक्षारोपण केले.
सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे जपत विकास दळवी व पर्सनल पावर ग्रुप यांचे नागरिकांनी आभार मानले.


