कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत पोलिसांनी वर्षभरापूर्वी पूर्वी हरवलेले दीड लाख किमतीचे 12 मोबाइल शोधून कर्जतकरांना दिले आहेत. एक वर्षा पुर्वी कर्जत पोलिस स्टेशन हद्दीत  1) अविनाश बाळासाहेब शिंदे, रा. कर्जत २) गोकुळ अंकुश शिंदे, रा. कर्जत ३) महादेव संजीवन अगवण, रा.खेड, ता कर्जत 4) राम भगवान महारनवर, रा. पाटेगाव, 5) राजेंद्र बबन सावंत, रा. शिरपूर  6) सोहेल रियाज मुंडे, रा. राशीन 7) नवनाथ त्रिंबक मोरे, रा खेड 8) करण दत्तात्रय चव्हाण, रा. राशीन ९) दत्तात्रय मारुती जाधव, रा. शिंदा, 10) विशाल तानाजी पावणे, रा. जळकेवाडी 11) संघपाल संतोष कांबळे, रा. राशीन, 12) गणेश गाढवे, रा. बिटकेवाडी यांचे मोबाईल हरवले होते. पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी कसोशीने प्रयत्न करून हरवलेले मोबाइल त्यांना परत मिळुन दिले आहेत. याकामी अहमदनगर मोबाईल सेलची मदत झाली.

मोबाईल मिळालेले नागरिक आनंदी झाले त्यांनी कर्जत पोलिसांचे आभार मानले.

सदरची कारवाई कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस अंमलदार, श्याम जाधव, अमित बर्डे, पांडुरंग भांडवलकर सुनिल खैरे, नगर मोबाईल सेल चे प्रशांत राठोड यांनी केली आहे.