कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत पोलिस स्टेशन या ठिकाणी सर्व पोलीस पाटील यांचे मीटिंग घेण्यात आली. सदर मिटिंग मध्ये विविध ठिकाणी होणाऱ्या घरफोड्या, चोऱ्या संदर्भात चर्चा करून पोलीस पाटील यांना खालील सूचना देण्यात आले आहेत.
1. घरफोड्या, चोऱ्या संदर्भात गावात लोकांची जनजागृती करून आपल्या मौल्यवान वस्तू सोने चांदी हे कपाटात किंवा पेटीत ठेवू नये त्या ठिकाणी चोरट्यांना सदस्याची सापडतात शक्यतो आपले सर्व दागिने हे बँकेत ठेवावे.
2. आपल्या घराचे दरवाजे हे एक पाकी म्हणजे एका फळीचे असावेत त्याला लॅच बसवलेला असावा. त्यामुळे चोट्यांना सहजासहजी लोक तोडता येणार नाही व चोरीस आपला प्रतिबंध करता येईल.
3. आपल्या घराच्या खिडक्या या बांधकामामध्ये फिट असाव्यात त्या स्क्रू मध्ये फिट केलेल्या नसाव्यात.
4.सर्व पोलीस पाटील यांनी आपल्या गावात कर्जत पोलिसांच्या मदतीने ग्रामसुरक्षा दल स्थापन करन्यासाठी पुढाकार घेऊन त्यांच्या मार्फतीने गावात रात्र गस्त तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या कॉल वेळी नाका-बंदी करावी.
5. आपल्या गावात ग्रामसुरक्षा यंत्रणेमध्ये प्रत्येक घरातील किमान दोन नंबर ॲड करून घ्यावेत.
6. आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत मार्फतीने महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावेत. त्याकामी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून पैसे खर्च करता येतील आणि त्याबाबत BDO कर्जत यांच्या मार्फतीने ग्रामपंचायत ला पत्र दिले आहे.
7. गावातील उपयुक्त माहिती पोलीस स्टेशनला कळवावी.
अशा विविध सूचना पोलीस पाटील यांना देण्यात आल्या मीटिंग करिता कर्जत तालुक्यातील पोलीस पाटील हजर होते.
पोलिस निरीक्षक
चंद्रशेखर यादव
कर्जत पोलिस स्टेशन


