कर्जत (प्रतिनिधी) : कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात अनेक मदतीचे हात पुढे आले, त्यापैकीच एक म्हणजे अभिनव प्रतिष्ठान. स्वातंत्रदिना निमित्त कर्जत मधील अभिनव हॉस्पिटलमध्ये 15 ऑगस्ट रोजी दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. रुग्णांना ऍडमिट झाल्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत ऑक्सिजन व हॉस्पिटल बील इ मोफत सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच तज्ञ डॉक्टरांच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली रुग्णांवर योग्य उपचार केले जाणार असल्याचे अभिनव हॉस्पिटल कडून सांगण्यात आले.
अभिनव हॉस्पिटल
प्रभातनगर, कुळधरण रोड, ता कर्जत
मो. ९९६०९६४२६६, ९७६६९०९९३६, ९९६०४६७६५६


