कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील बेलगाव शिवारात गुन्हे करण्यासाठी तलवार बाळगणाऱ्या दोन गुन्हेगारांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. आज 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजने च्या सुमारास कर्जत पोलीस ठाणे घरफोडी गु .र . नंबर 499 / 21 भा .द.वि .कलम 457 380 461 या टी. व्ही. चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नामे 1)भुंग्या उर्फे शुभम संजय गायकवाड व 2)निखिल राजेद्र पवार दोन्ही रा. मिरजगांव, ता. कर्जत यांचा मिरजगांव बेलगांव गावचे शिवारात शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की सदरचे इसम आपल्या ताब्यात धारदार तलवार बाळगून आहेत आणि ते गुन्हा करण्याची शक्यता आहे व ते सध्या मिरजगाव परिसरात फिरत आहेत. दरम्यान मिरजगांव ते बेलगाव रस्ता लगत न्यु इंग्लिश स्कुल जवळ सदरचे दोघे जण इसम त्यांच्याकडे असलेल्या एका मोटार सायकल वरून बेलगांव चे दिशेने जात असलेले दिसले. त्यावेळी त्यांना कर्जत पोलीस स्टेशन चे अधिकारी व जवान यांनी जागीच पकडुन त्याची अंगझडती घेतली असता इसम नामे भुंग्या उर्फे शुभम संजय गायकवाड यांचे कब्जात एक लोंखडी मुठ असलेली धारदार तलवार मिळुन आली. सदर इसमाना ताब्यात घेऊन कर्जत पोलीस ठाण्यात हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींवर यापुर्वी चे जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक श्री अमरजीत मोरे, पोलीस जवान प्रबोध हंचे, रवी वाघ जितेंद्र सरोदे, बबन दहिफळे, सुभाष पंडागळे, गणेश काळणे, महादेव कोहक यांनी केली..