कर्जत (प्रतिनिधी) : आज दि 14/08/2021 रोजी दुपारी 12/00 वाजेचे सुमारास फिर्यादी गयाबाई लक्ष्मण देशमुख, वय 75 वर्षे, रा. वाळुंज, बाबुर्डी घुमट तालुका नगर, हल्ली राहणार भिगवण या भिगवन ता इंदापुर येथुन मुलगी शोभा केरु देवतरसे व नंदा संतोष गोरे यांची भेट घेवुन नगर येथे जाण्यासाठी निघाले भिगवन येथुन एस टी बसमध्ये बसुन कर्जत येथील एस टी स्टॅण्डवर 02/00 वा चे सुमारास उतरल्या. त्यानंतर दुपारी 02/30 वा चे सुमाास कर्जत बस स्टैंड येथे कर्जत ते अहमदनगर एस टी लागल्याने सदरच्या एस टी मध्ये चढत असताना फिर्यादीचे पाठीमागे एक मुलगा गाडीमध्ये चढत होता. त्यावेळी गाडीत चढत असताना त्यांच्या लक्षात आले की, गळ्यातील सोन्याची काळे मनि असलेली पोत कोणीतरी हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी त्या मोठयाने ओरडल्या असता एस टी स्टँडवरील इसम नामे 1) नवनाथ धांडे रा धांडेवाडी, 2) पोपट तोरकड रा तोरकडवाडी ता कर्जत जि अहमदनगर यांनी त्यास जागीच पकडले. त्यावेळी त्यास त्यांनी त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1)गणेश मछिंदर दुबळे वय 22 वर्षे, रा. सोनारी ता परांडा जि उस्मानाबाद असे सांगुन त्याचेसोबत 2)सविता बंडु जाधव व 3)उषा अशोक सांगळे, राहणार, सोनारी ता परांडा असे असल्याचे सांगितले. त्यावेळी वरील दोन्ही महीलाही त्याठिकाणी मिळुन आल्या. त्यावेळी नवनाथ धांडे यांनी कर्जत पोलीस स्टेशनला फोन करुन सांगितल्याने त्याठिकाणी पोलीस जवान बळीराम काकडे, रवी वाघ, शफीक बेग त्याठिकाणी तात्काळ पोहोचले. त्यांनी वरील तीन लोकांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले.
सदर आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सलीम शेख, शाहूराज तिकटे करत आहेत.


