कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत मधील  ओम साई मेडिकल संचलित , साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर युनिट यांच्याकडून महात्मा गांधी विद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये हॉस्पिटलच्या माध्यमातून बीपी,सुगर,ब्लड ग्रुप, पेशींचे प्रमाण, कॉर्डियोग्रम, अश्या तपासण्या करण्यात आल्या.

तपासणी दरम्यान साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर युनिट चे डॉ मनोज कापसे, अतुल कापसे, स्वप्नील जोशी , दादा पाचारणे, अश्विनी काकडे, सीमा रामटेके आदी सह महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. शिबिर संपन्न झाल्यानंतर डॉ मनोज कापसे यांचा विद्यालयाकडून सत्कार करण्यात आला व सर्वांचे आभार मानण्यात आले.