उद्योजक निलेश निकम यांच्याकडून १६ यंत्रे अधिकाऱ्यांकडे सुपुर्द
कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत येथील शासकीय कार्यालयांना अनंत-आशा इंटरप्रायजेस कंपनीकडून १६ अग्निशमन यंत्रे (Fire Extinguisher)भेट देण्यात आले.कर्जत पोलीस ठाणे,तहसील कार्यालय,पंचायत समिती,सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग रेहकुरी, नगरपंचायत आदींना ही यंत्रे देण्यात आली आहेत.शासकीय कार्यालयांमध्ये विद्युत उपकरणे, संगणक प्रणाली आदींमुळे शॉर्टसर्किट तसेच इतर कारणास्तव अपघाती आग लागल्यास या अग्निशमन यंत्रांमुळे ही आग तात्काळ आटोक्यात आणता येते.आणि शासकीय कागदपत्रांचे आणि स्वतःचे आगीपासून संरक्षण करता येते.प्रत्येक शासकीय कार्यालयात अग्निशमन यंत्रणा असावी आणि ती प्रत्येकवेळी अपडेट केली जावी, त्यातील गॅस रिफिलिंग असेच अन्य बाबींवर लक्ष देण्यात यावे' असे शासनाचे निर्देश आहेत मात्र अनेक कार्यालयात ही यंत्रे दिसत नाहीत.त्यामुळे अपघाताने लागलेल्या आगीचा धोका टाळता शक्य होत नाही.त्यामुळे बाब लक्षात घेऊन अनंत-आशा इंटरप्रायजेसचे निलेश निकम यांनी ही यंत्रे भेट दिली आहेत.आकस्मित आग लागल्यास ही यंत्रे कशी हाताळावीत? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,तहसीलदार नानासाहेब आगळे, गट विकास अधिकारी अमोल जाधव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमित निमकर,वनाधिकारी सागर केदार, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव उपस्थित होते.ही यंत्रे दिल्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांनी निलेश निकम यांचे आभार मानले.
'अग्निशमन यंत्रांमुळे शासकीय कार्यालयांत लागलेल्या आगीमुळे होणाऱ्या अपघातांपासून स्व-संरक्षण आणि महत्वाच्या वस्तुंचे नुकसान टाळता येणार आहे.कर्जतचे सर्वच शासकीय अधिकारी-कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांच्या या कामाचे सोशल माध्यमांवर नेहमीच कौतुक पहायला मिळते.त्यांना दिलेल्या या छोट्या भेटीचे समाधान वाटते'
-निलेश निकम,अनंत आशा इंटरप्रायजेस


