कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील नवसरवाडी येथे मांडूळाची तस्करी करणाऱ्या एकाला कर्जतमधील वनपरिक्षेत्र विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कारवाई दरम्यान तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पथकाने मांडूळासह मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला.दिनांक १६/०८/२०२१ रोजी दुपारी १५.०० वा. च्या दरम्यान सहया वनसंरक्षक श्री रमेश देवखिळे  श्रीगोंदा यांच्या दुरध्वनीवरुन मौजे नवसरवाडी ता. कर्जत जि.अ.नगर या ठिकाणी वन्यजीव मांडुळ ची तस्करी होण्याची शक्यता असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने वनपरीक्षेत्र अधिकारी कर्जत श्री. ग. दि. छबिलवाड, वनरक्षक सुरेश भोसले, आजिनाथ भोसले, दिपक गवारी, वनमजूर श्री किसन नजन यांचेसह खाजगी गाडीने साध्या वेशात नवसरवाडी या ठिकाणी जाऊन सदर घटनेची खात्री करण्यासाठी बनावट गिन्हाईक म्हणून संबंधीत इसमाकडे गेलो असता अज्ञात ४ व्यक्ती कडे १ मांडुळ असल्याचे खात्री झाली. सायं १७.३० वा त्यांना ठरलेल्या व्यवाहाराप्रमाणे ७,००,०००/- रु. रक्कम देण्याचे मान्य केल्याने त्या अज्ञात ४ व्यक्ती पैकी दोघांनी घरी जाऊन मांडुळ आणले. मुद्येमाल मांडुळ व आरोपी यांची खात्री होताच एक आरोपी श्री विशाल सुर्यभान धनवटे वय २५ वर्ष रा. नवसरवाडी ता.कर्जत जि.अ.नगर व मुद्देमाल ताब्यात घेतला. अज्ञात ३ आरोपी मोटरसायकलवरुन पळुन जाण्यात यशस्वी झाले. मांडुळाचे वजन केले असता ते १.१५ किलो वजनाचे आहे. सदर प्रकरणी गुन्हा नोंद केला असून सदर आरोपीस मा. ज्युडिशियल मॅजीस्टेट प्रथम वर्ग १ कर्जत ता. कर्जत यांच्या न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस ७ दिवसाची वनकस्टडी दिली आहे.

पुढील तपास  उपवनसंरक्षक अ.नगर सुवर्णा माने व  सहया. वनसंरक्षक श्रीगोंदा श्री रमेश देवखिळे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी कर्जत (प्रादेशिक) श्री.ग. दि. छबिलवाड, वनरक्षक सुरेश भोसले, आजिनाथ भोसले, किशोर गांगर्डे, दिपक गवारी व वनकर्मचारी कर्जत करीत आहेत.

कर्जत तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांची शिकार अथवा तस्करी होत असल्यास तात्काळ वनपरीक्षेत्र कर्जत कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन वनपरिक्षेत्र कार्यालय कर्जत यांचेकडून करण्यात आले आहे.