कर्जत पोलिसांनी केला सत्कार.

कर्जत (प्रतिनिधी) : सुरज सुखदेव सोळसे, वय २८ वर्ष, पद विशेष सहाय्यक, युनियन बँक ऑफ इंडीया, बारडगाव, ता.कर्जत, जि अहमदनगर वाहनाने सकाळी १०/३०वा. कर्जत शाखा येथुन रुपये ५० लाख विड्राल केली. कॅश गाडीत ठेवुन गाडी चालु केली असता एक अनोळखी लहान मुलाने आईल गळत असल्याचे सांगूण लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गाडीतुन ऑइल येऊ शकत नसल्याबाबत विश्वास होता आणि आरोपीने ऑइल फेकल्यासारखे लक्षात आले होते. सुरज सोळसे यांनी सतर्कपणा दाखवत सदरची कॅश पुन्हा गाडीत ठेऊन तात्काळ गाडी मागे घेऊन कॅश बँकेत जमा केली. सुरज सोळसे यांचे सतर्कतेमुळे ५० लाख रुपयाची लुट थांबली आहे. त्याचा कर्जत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सत्कार केला असुन कर्जत मधील जनतेला आवाहन केले आहे की, कोणी आईल गळत आहे, गाडीचे टायर पंक्चर झाले आहे, अंगावर घाण टाकून लक्ष विचलित करून, नोटा मोजून देतो असे सांगून, डिक्कीत ठेवलेले पैसे लक्ष विचलित करून इत्यादी कारणे सांगुन रोख रक्क्म चोरटया कडुन लुटण्याचे प्रकार होत आहे. तरी जनतेने सतर्कता बाळगावी. सदरवेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, बँकेचे मॅनेजर सचिन क्षीरसागर व स्टाफ उपस्थित होते.