कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत पोलिसांनी एकाच दिवसात वडारवस्ती, सिद्धटेक व सिद्धटेक फाटा, भांबोरा ता. कर्जत परिसरात दारू गुन्ह्याच्या अनुषंगाने छापे मारून कारवाई केली असून सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यामध्ये सावित्र प्रल्हाद रंधवे वय 65 वर्ष, रा. सिद्धटेक फाटा भांबोरा ता. कर्जत, रमेश मारुती रंधवे वय 58 वर्षे रा. सिद्धटेक फाटा, भांबोरा ता. कर्जत, दामू पवळा रंधवे वय 65 वर्षे सिद्धटेक फाटा, भांबोरा ता. कर्जत, राजेंद्र विठ्ठल चौगुले वय 52 वर्ष रा. वडार वस्ती, सिद्धटेक ता. कर्जत, शिवाजी रामदास जाधव वय 45 वर्ष रा. वडार वस्ती, सिद्धटेक ता. कर्जत , अनिल बंडू काळे वय 27 वर्षे रा. राक्षस वाडी ता. कर्जत यांचेकडून 10,424/- रुपये किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू व देशी दारू असा मुद्देमाल व एक 50,000/- रू की ची हिरो कंपनीची HF deluxe मोटासायकल नं MH16 CW3801 सह मिळून आले आहेत. 
Advt.
आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये 6 गुन्हे दाखल करण्यात आले असून 60,424 रु चा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई कर्जत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर यादव, पोसई भगवान शिरसाट, पोलीस अंमलदार तुळशीराम सातपुते, भाऊ काळे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे, सुनील वाबळे यांनी केली.


