कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील घुमरी येथील रहिवासी मारुतराव सोनाजीराव निंबाळकर (वय ९७) यांचे १७ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ते तसेच सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर गोविंदराजे भानुदास निंबाळकर यांचे ते आजोबा होत. समाज हितासाठी , सामाजिक न्याय , सामजिक वाद विवाद असे विविध कामे निस्वार्थी पणे मारुतराव निंबाळकर यांनी केली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली,सुना, नातवंडे असा परिवार आहे.


