कर्जत (प्रतिनिधी) : कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरू गोदड महाराज रथोत्सव सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवर, पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी योग्य नियोजन करून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कर्जत तालुक्यातील भाविकांना गोदड महाराजांचे दर्शन व्हावे म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन दर्शनाची सेवा युट्यूब लाईव्ह करून देण्यात आली होती. या युट्युब लाईव्ह वर सुमारे 13000 भाविकांनी ऑनलाईन दर्शन घेतले. हे युट्युब लाईव्ह दर्शन ए टी आर नेटवर्क प्रायोजित होते , तसेच रथोत्सव व्हिडीओग्राफी टीम च्या माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. रथोत्सव सोहळा युट्यूब लाईव्ह करण्यासाठी खान कॉम्प्युटर्स, वायजी इन्फोटेक, प्रोमोमॅक्स ॲडव्हर्टायझिंग, स्वप्निल मुळे, अदनान आत्तार, मंगेश ढवळे या टीम ने विशेष सहकार्य केले. ऑनलाईन दर्शन व्यवस्थित पार पाडल्याबद्दल पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडून टीमचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने , पत्रकार भाऊसाहेब तोरडमल आदी उपस्थित होते.


