कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात कर्जत पो. स्टे. गु रजि. न. 499/2021 भारतीय दंड संहिता 461,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हाचा तपास कर्जत पोलीस करत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर चा गुन्हा हा आरोपी नामे स्वप्नील गायकवाड याने त्याचे साथीदारांच्या मदतीने केला आहे. त्याचा शोध घेतला असता तो दि. 10/08/2021 रोजी मिळुन आला त्याचे कडे अधिक तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा हा आरोपी नामे गणेश निंबाळकर, निखील पवार, शुभम उर्फ भूंग्या गायवाड यांचे मदतीने केला असल्याची कबुली दिली.याप्रकरणी कर्जत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार आहेत. स्वप्नील संजय गायकवाड, वय २२, रा. बेलगाव व गणेश राजेंद्र निंबाळकर, वय : १९ रा. मिरजगाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर गुन्ह्यातील फरार आरोपी चा मिरजगाव दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक अमर्जीत मोरे, हेड कॉन्स्टेबल प्रबोध हांचे, दहिफळे, पोलीस नाईक सरोदे, वाघ, पंडागले, पोलीस कॉन्स्टेबल काळाने, कोहक यांनी शोध घेतला असता ते चोरीस गेल्या मालासह मिळुन आले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक अमर्जीत मोरे, हेड कॉन्स्टेबल हांचे, दहिफळे, पोलीस नाईक सरोदे, वाघ, पांडगले, पोलीस कॉन्स्टेबल काळाने, कोहक यांनी केली.


