कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथेववव शिवसेना तालुका प्रमुख बळीराम यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
गेल्या काही दिवसात शिवसेना व युवासेनेमध्ये पदाधिकारी यांच्यात बदल करण्यात आले आहेत. बळीराम यादव यांच्या सारख्या अनुभवी नेतृत्वाला दीपक गांगर्डे सारख्या युवा नेतृत्वाची साथ मिळत असल्याने कर्जत शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणूका व पक्ष मजबुत करण्यासाठी चर्चा झाली, तसेच गाव तिथे शिवसेना व युवासेना शाखा करण्याविषयी चर्चा करण्यात आली.तसेच गाव तिथे शिवसेना व युवासेना शाखा, तसेच गावातील पाणंद रस्ते, बंधारे, ओढा खोलीकरण, डीपी बसवणे, रस्ते डांबरीकरण या सर्व प्रश्नांवर चर्चा करून करण्यात आली.
सविस्तर चर्चा करून कर्जत तालुक्याचे आमदार रोहित दादा पवार यांना शिवसेनेचे पदाधिकारी भेटून विकास कामे मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ भेटणार आहे.
या वेळी युवासेना तालुकाप्रमुख दिपक गांगर्डे, शिवसेना नेते अमृत लिंगडे , उपतालुका प्रमुख सुभाष जाधव, महावीर शेठ बोरा, शिवाजी नवले,पोपट धनवडे, अक्षय घालमे, बिबिषण गायकवाड, तालुका प्रसिद्धी प्रमुख अविनाश मते व पौरुष जाधव, दिपक मांडगे, अतुल गांगर्डे, बबन दळवी,रवींद्र खेडकर, अमोल सुपेकर,अक्षय तोरडमल,महेंद्र धोदाड,माउलि जंजिरे,राजू सुद्रिक, राजेंद्र तांदळे, मयूर चव्हाण, नानासाहेब म्हस्के, लखन जगताप, चंदुभाऊ घालमे ,सतीश पवार, सुदाम गदादे, कुमार मांडगे उपस्थित होते.


