कर्जत (प्रतिनिधी) : कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी 10 जुलै रोजी कर्जत पोलीस स्टेशन येथे कर्जत तालुक्यातील सर्व बँका, पतसंस्था, फायनान्स व एटीएम चे चालक व मालक यांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने नोटिसा देण्यात आल्या
चंद्रशेखर यादव यांनी सदर बैठकीमध्ये सर्वांना सूचना देऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 68 प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.
1. रोख रकमेच्या अधिकारी-कर्मचारी व इतर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या बँकेत एक 24 तास सुरक्षा रक्षक नेमावा.
2. सुरक्षेच्या दृष्टीने सायरन सिस्टीम ची व्यवस्था चांगल्या पद्धतीने ठेवण्यात यावी. तसेच बँका पतसंस्था व एटीएम मध्ये इमर्जन्सी सायरन सिस्टीम बसवावी. कोणताही अनुचित प्रकार होणार असल्यास बँकेतील कोणत्याही बँक कर्मचाऱ्याला अशावेळी आपत्कालीन सायरन वाजवता येईल आणि पुढची घटना होणार नाही याची काळजी घेता येईल.
3. आपण सुरक्षेच्यादृष्टीने नाईट व्हींजन सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. काही कालावधीचे रेकॉर्डिंग चे जतन करावे. तसेच आपल्या सीसीटीव्ही कॅमेरे चा सहजासहजी चोरट्यांना नेता येणार नाही अशा पद्धतीने DVR ठेवण्यात यावा.
4. सीसीटीव्ही मधील दोन कॅमेरे हे रस्त्याच्या दिशेने बाहेर लावावीत.
5. आपल्या सायरन सिस्टीम व सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहे अगर कसे याबाबत वेळोवेळी तपासणी करावी.
6. आपण सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या व इतर गोष्टींचा इन्शुरन्स काढलेला असावा.
7. आपण सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या बँकेत व एटीएम मध्ये एक रजिस्टर ठेवण्यात यावे. त्या रजिस्टरमध्ये आपल्या बँकेत भेट दिल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नोंद घेता येईल.
8.आपण कॅश बँकेत मोजावी, पैसे मोजण्यासाठी अज्ञात इसम कडे देऊ नये, तसेच अंगावर घाण टाकून अगर खाजखुजली टाकून पैसे चोरी होऊ शकतात. आपले पैसे सुरक्षित ठेवावे. पैसे गाडीमध्ये किंवा गाडीच्या डिकीत ठेवू नये. अशा विविध सूचना सुरक्षेच्या दृष्टीने आपण आपल्या बँकेत बोर्डावर लावाव्यात.
9. आपण आपल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे फोन नंबर ग्राम सुरक्षा यंत्रणेत समाविष्ट करून ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावी.
अशा विविध सूचना सर्व बँका, पतसंस्था, फायनान्स व एटीएम चे चालक व मालक देण्यात आल्या आहेत. सदर बैठकीला स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, रेणुका माता, शिवरत्न, वृषाली व इतर वेगवेगळ्या पतसंस्था, मेट्रो मल्टि स्टेट, सद्गुरू मल्टि स्टेट, नागेबाबा मल्टि स्टेट, पारनेर सैनिक बँक, रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्था, त्रिमूर्ती पतसंस्था, नगर अर्बन बँक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.









