कर्जत (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे युवा नेते , कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस,मिरजगांव यांच्या वतीने मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास १५०० सिरिंजची मदत पुरवण्यात आली आहे.कोरोना लसीकरणासाठी कमतरता असणाऱ्या सिरिंजचा वेळेत पुरवठा झाल्याने या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. मंगळवार दि १४ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र,मिरजगांव येथे कोरोना लसीकरणासाठी कमतरता असणाऱ्या सिरींजची मदत देण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.शेकडे यांच्याकडे सिरींज सुपूर्द करण्यात आल्या यावेळी उद्योजक व युवा नेते अतुल राजेजाधव,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिरजगांव शहराध्यक्ष तानाजी पिसे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष गणेश नलावडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संकेत चेडे,प्राथ. आरोग्य केंद्र मिरजगांव रुग्ण कल्याण समिती सदस्य कुलदीप गंगावणे,तसेच युवा नेते विशाल तनपुरे,श्रीराम रणदिवे,कृष्णा जगताप,विशाल तनपुरे,संदिप जवणे,सौरभ गोरे व संजय गोरे आदी उपस्थित होते.
आमदार रोहितदादा पवार मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत नेहमीच प्रयत्नशील आहेत, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून प्राधान्याने लसीकरण करून घ्यायला हवे तसेच लसीकरणाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.
- अतुल राजेजाधव, युवा नेते, राष्ट्रवादी युवक काँग्रेस


