कर्जत (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते स्व. पांडाभाऊ उगले यांनी १९७७ ते २०२१ अखेर पर्यंत सातत्याने पुनर्वसनाच्या नव्या धोरणासाठी आयुष्यभर संघर्ष केला,कर्जत-श्रीगोंदा-आष्टी तालुक्यातील सीना प्रकल्पग्रस्तांना संघटित करत पुनर्वसनाच्या नव्या धोरणात्मक लढ्याशी स्वतःला जोडून घेतले,सरकार दरबारी अहोरात्र संघर्ष करत विस्थापितांचे संसार उभे केले त्यामुळे सीना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनात पांडाभाऊ उगले यांचे मोठे योगदान आहे असे सांगत पंचायत समिती सदस्य बाबासाहेब गांगर्डे यांनी स्वर्गीय उगले यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
स्व.पांडुरंग उगले यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त थिटेसांगवी येथील उगले वस्तीवर आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना गांगर्डे बोलत होते.यावेळी घोगरगावचे सरपंच बाळासाहेब उगले,नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पै.बलभिम शेळके,श्रीगोंदा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक उत्तम तरटे,थिटेसांगवी सोसायटी चेअरमन किसनराव उगले,पोलिस पाटील शिवाजीराव वाळके-पाटील,डाॅ.बाळासाहेब उगले उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले कि,प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीसाठी नवीन ग्रामपंचायत करण्यासाठी सरकार दरबारी एक हजार लोकसंख्येची अट शिथिल करून ती ३५० केली.त्यातून चवर सांगवी गावची स्वतंत्र वसाहत स्थापन करण्यात आली.राज्याचे पुनर्वसन धोरण ठरविणाऱ्या संघर्षाचेही ते भाग बनले.स्व.पांडाभाऊ यांनी सिना धरणग्रस्तांच्या सुयोग्य पुनर्वसनासाठी मोठी चळवळ उभी केली होती.राज्यकर्त्यांच्या माध्यमातून विस्थापितांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान सिना धरणग्रस्तांना विसरता येणार नाही.धरणग्रस्तांचे पुनर्वसन व कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी मिळाली पाहिजे.सिनाकाठच्या शेतकर्यांना सीना बॅकवॉटरचा लाभ मिळावा म्हणून वैयक्तिक पाईपलाईन, लिफ्ट योजना, वीजजोडणी यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.सिनापुत्र आबासाहेब निंबाळकर,माजी खासदार स्व.रखमाजी पाटील गावडे,दिवंगत शिवाजीराव नागवडे,ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्या सोबतीने जिरायत भागाचे नंदनवन करण्यात सिंहाचा वाटा त्यांनी उचलला त्यामुळेच आज सीनाकाठ समृद्ध झालेला दिसतो आहे.
थिटेसांगवी ग्रामपंचायत सदस्य गोरख वाळके,विष्णू वाळके,माजी सरपंच निळकंठ वाळके,बलभिम वाळके ,वाघमोडे गुरुजी,श्रीरंग उगले,दिगंबर गाडे,श्रीगोंदा तालुका विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अदिल शेख,युवा नेते प्रशांत भोस,प्रा.दादासाहेब महारनवर,युवा व्याख्याते अमोल देवकाते,शामराव वाळके,दत्तात्रय उगले,अशोक उगले,रावसाहेब उगले,रमेश बचाटे,जालिंदर वाळके,दादासाहेब वाळके,केशव वाळके,आप्पासाहेब शेळके,सागर उगले,आप्पासाहेब उगले,हनुमंत जरांगे,प्रकाश वाळके,संकेत जंजीरे,सुभाष उगले,अंबादास उगले,रघुनाथ उगले,वैभव उगले,महेश उगले,प्रसाद उगले आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.



