कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील मिरजगाव दुरक्षेत्र येथे एक इसम संशयित आहे. त्याच्याकडे चोरीचे साहित्य आहे. तात्काळ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोहेकाँ बबन दहिफळे, पोना जितेंद्र सरोदे, पोकाँ गणेश काळाणे यांना सदर इसमास ताब्यात घेणेकामी रवाना केले. सदर वर्णनाचा इसम मिरजगाव बसस्थानक परिसरात मिळून आला. त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रमोद उर्फ नारायण काकासाहेब पठाडे, रा.जालना असे सांगितले सदर इसमाची झडती घेतली असता, त्याच्याकडे पाथर्डी मधील चोरी केलेला एक मोबाईल, नगर मधून चोरी केलेला एक मोबाईल आणि जालना या ठिकाणी चोरी एक मोटर सायकल 10,5000/- किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपीविरुद्ध पोलीस शिपाई गणेश काळाणे यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर आरोपीला माननीय न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कर्जत पोलिस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रवीण पाटील पाथर्डी पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक श्री. अमरजित मोरे, पोहेकाँ बबन दहिफळे पोना जितेंद्र सरोदे पोकाँ गणेश काळाणे, पोकाँ महादेव कोहक, चापोकाँ शकिल बेग यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोना जितेंद्र सरोदे हे करित आहेत.


