कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील पाटेगाव गावात दहशत माजविणारे आरोपी नामे 1) अक्षय प्रभाकर डाडर 2) समाधान सर्जेराव डाडर दोघे रा. पाटेगाव ता.कर्जत याचेतील आरोपी नं. 1 याचे पाटेगाव गावात चिकनचे दुकान आहे. फिर्यादी नामे चंद्रकांत प्रकाश साबळे यांनी पाटेगाव गावात चिकनचे दुकान नव्याने सुरू केले. तक्रारदार यांनी नवीन दुकान का टाकले असे म्हणुन फिर्यादी चंद्रकांत प्रकाश साबळे व फिर्यादीचे चुलते संदिप साबळे यांना त्रास देणे सुरू करून कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करुन गंभीर रित्या जखमी केले. सदरची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोना श्याम जाधव, पोकाँ गोवर्धन कदम, पोकाँ महादेव कोहक, पोकाँ संतोष फुंदे, चापोकाँ शकील बेग असे घटनास्थळी रवाना करून आरोपी ताब्यात घेण्यास सांगितले. त्यांनी सदर आरोपीतांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेतले पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे यांनी सदर आरोपीतांना मा. न्यायालयसमोर हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपी नामे 1) अक्षय प्रभाकर डाडर 2) समाधान सर्जेराव डाडर दोघे रा. पाटेगाव ता.कर्जत यांना 04 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे.
यातील अक्षय डाडर याच्यावर यापूर्वीचा 1 गुन्हा दाखल आहे.
कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिकांवर कोणाचीही दादागिरी सहन केली जाणार नाही. असा काही प्रकार असल्यास नागरिकांनी कर्जत पोलिसांशी संपर्क करावा.
- चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक श्री. अमरजित मोरे, पोना श्याम जाधव, पोकाँ गोवर्धन कदम, पोकाँ महादेव कोहक, पोकाँ संतोष फुंदे, चापोकाँ शकिल बेग यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, कोहक हे करित आहेत.


