कर्जत (प्रतिनिधी) : बीडच्या सराईत चोरट्याला घरफोडी प्रकरणी कर्जत पोलिसांकडून मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली असून , आरोपीला 8 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सराईत चोरट्याला पकडून कर्जत पोलिसांनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे.

दिनांक 28/8/2021 रोजी पहाटे 3/00 वा कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील राशीन गावामध्ये राशीन ते करमाळा रोडवरील साईराज मशिनरी नावाचे दुकान कोणी तरी अज्ञात तीन चोरट्यांनी फोडुन दुकानातील जुन्या व नव्या कॉपरच्या वायरी किंमत अंदाजे 3,80,000/- रुपयाच्या चोरून घेऊन गेले होते. त्यानंतर कर्जत पोलीस स्टेशन येथे फियादी - श्री राहुल आबासाहेब जांभळकर, वय -30 वर्षे, राशीन, ता. कर्जत यांचा गुन्हा दाखल करून घेतला. सदरचे आरोपी पकडन्यासाठी कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव साहेब यांनी पोलीस स्टेशन  मधील एक टिम तयार करून त्यामध्ये पोसई श्री. भगवान शिरसाठ, पोहेकॉ तुळशीदास सातपुते , पोलीस अंमलदार सागर म्हैत्रे, गणेश ठोंबरे, भाउसाहेब काळे, संपत शिंदे, गणेश भागडे यांना तपासाच्या योग्य सुचना दिल्या. त्यानंतर तपासत राशिन, कोर्टी, करमाळा, नान्नज, जामखेड, सौताडा, पाटोदा, मांजरसुंबा, बीड शहर या ठिकाणी CCTV चेक केले त्यावरून राशीन वरून करमाळा रोडने जामखेड मार्गे बीडकडे आरोपी गेल्याचे त्यांनी तपासात निष्पन केले व त्यांनी गुन्ह्यात एका Mh 03 BC 3243 क्रमांकाची स्विप्ट गाडी वापरल्याचे शोध घेतला . त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव साहेबांच्या आदेशाने पोहेकॉ तुळशीदास सातपुते पोलीस अंमलदार सागर म्हैत्रे, गणेश ठोंबरे, भाउसाहेब काळे यांनी ता .04/08/21 व ता .05/08/21 रोजी बीड येथे जावुन बीड मधील  मोमीनपुरा भागातील सराईत गुन्हेगार 1 ) सोयब कमरोउद्दीन शेख, वय - 26 वर्षे 2) फारुख शेख ( फरार ) 3 ) सलमान शेख ( फरार ) यांना गुन्ह्यात निष्पन्न  करून त्यांच्यापैकी 1) सोयब कमरोद्दीन शेख अटक केले व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट गाडी व 73,950 रु ची तीन गोण्या 147 kgs कॉपर वायर जप्त करण्यात आली. कर्जत पोलिसांनी सतत आणि सलग दहा दिवस गुन्ह्याचा वेगवेगळ्या प्रकारे तपास करून आरोपी निष्पन्न करून बीडमधून अटक केले.

सदर आरोपीवर बीडमध्ये चोरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी आपल्या दुकानात आणि परिसरामध्ये जास्तीत जास्त सीसीटीव्ही लावून घ्यावे. जेणेकरून असा कोणताही प्रकार घडल्यास आपल्याला आरोपी निष्पन्न करणे आणि आरोपी अटक करणेकामी मदत होईल. पुढील काळात होणाऱ्या चोऱ्या सुद्धा थांबविता येतील.

-- चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक.

सदरची कारवाई कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षीक भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार, तुळशीदास सातपुते, सागर म्हैत्रे, गणेश ठोंबरे, भाऊसाहेब काळे, संपत शिंदे, देवीदास पळसे, गणेश भागडे, संभाजी वाबळे, मारुती काळे यांनी केली.