कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील   जगदंबा देवी देवस्थान येथील सभा मंडपाचे भूमिपूजन कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दत्तात्रय सुपेकर यांच्या हस्ते टिकाव टाकून कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी सुधीर जगताप, शेशेराव सुपेकर, मंगेश जगताप, अशोक जगताप, शासकीय प्रशासक  पवार, ग्रामसेवक विजयकुमार बनाते, मारुती सुपेकर, कांतिलाल सुपेकर, इंजि. राहुल चितळे, इंजि. शेखर चितळे, इंजि. अजित बाबर पाटील, नाना सुपेकर, माऊली गुंड, संदीप सुपेकर, बाळासाहेब सुपेकर, सुभाष गुंड, पोपट सुपेकर, अरुण तांबे, शिवाजी सुपेकर तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. खुप दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामाचा विषय मार्गी लावल्याबद्दल आमदार पवार यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.