कर्जत (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळामध्ये हिंदू सणाना शासन निर्बंध लावत असताना  तालुक्यांमध्ये बिकट परिस्थिती असताना, तिसऱ्या लाटेची शक्यता आहे अश्या परिस्थितीत सामान्य लोकांना नियम वेगळे व अधिकारी व सत्ताधाऱ्यांची, वेगळे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं ,लग्न असो किंवा कोणते कार्यक्रम समारंभ असो त्याला ठराविक लोकांची मर्यादा घालून देण्यात आली ,परंतु आज कर्जत येथे दादा पाटील महाविद्यालय मध्ये जवळजवळ आठशे शिक्षकांचा प्रशिक्षण नावा खाली प्रचंड गर्दी करून  कार्यक्रम कोणत्या आधारावर प्रशासनाने घेतला हे लोकांना समजणे अवघड आहे एकीकडे मुलांची शाळा ऑनलाईन घेतात मग प्रशिक्षन ऑनलाईन जमले नसते का? यामधून बाधित झालेला एखादा शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला तर जबाबदारी कोणाची प्रसंगी सर्व शिक्षकांना जेवणाचा थाठ घातला गेला होता या ठिकाणी कोणतीही कोरोणाची काळजी घेण्यात आली नाही साधे टेंमप्रेचर घ्यायचे मशीन सुद्धा प्रवेश द्वारा वरती न्हवते   यावरून प्रशासन कोव्हिड  च्या संदर्भात किती जबाबदारीने वागत आहे हे समजते शेवटी कार्यकारी नियम फक्तं सामान्य लोकांसाठी च आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे.


- अभिजित जवादे

 शहराध्यक्ष, भाजपा, मिरजगाव