कर्जत (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर हे गेल्यावेळेस सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमच्या सोबत होते, आज पण आहेत, तसेच राष्ट्रवादीचे नेते जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे त्यावेळेस होते पण आज नाहीत असे कर्जत येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नी निवडणुकी संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत आ प्रा राम शिंदे यांनी सांगितले.

यावर पत्रकारांनी काकासाहेब तापकीर यांना विचारले की तुम्ही २०१७ ला इकडेच होते, आताही इकडेच आहेत पण तेव्हा कारवाई झाली नाही , यावर आ शिंदे म्हणाले की तेव्हा कारवाई झाली नाही, आत्ता कारवाई झाली, यावर पत्रकारांनी परत प्रतिप्रश्न करताना विचारले की तेव्हा का कारवाई झाली नाही , याला उत्तर देताना आ राम शिंदे म्हणाले की हे तात्यांना विचारले पाहिजे, त्यावेळेस कारवाई का झाली नाही , आणि ती आजच कशी केली हे तात्यांना विचारले पाहिजे. असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.