कर्जत (प्रतिनिधी) : मिरजगांव येथे रमजान ईद सणा निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने शिरखुर्मा पार्टी कार्यक्रमाचे आयोजन पिरसाहेब गल्ली येथिल( जामा मशीद) येथे करण्यात आले होते व समस्त मित्रपरिवार व ग्रामस्थांना यावेळी निमंत्रित केले होते.
मानवी सलोखा,एकता, बंधुता अधिक दृढ व्हावी या भावनेतुन मुस्लिम बांधवांच्या वतीने या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले याबद्दल मुद्दसरभाई शेख, सलीमभाई आतार, अय्युबभाई सय्यद,शाहरुखभाई सय्यद, जाकिरभाई शेख व नियोजन समिती यांचा सत्कार ND पाटील मित्रपरिवार,वीरराजे ग्रुप तसेच वीरपाटील परिवार यांचे वतीने करण्यात आला.
यावेळी नंदकुमार वीरपाटील,शाहरुख सय्यद,विशाल बाबर ,अक्षय वहील,नंदकुमार बावडकर,धनंजय खेडकर,संजू सकट,अजय त्रंबके,आकाश बनकर, विवेक जाधव, कैफ बागवान, तसेच N D पाटील Friend circle,वीरराजे ग्रुप तसेच मुस्लिम बांधव व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


