कृषी विभाग : कर्जत येथे  २७ औजार बँक धारकांची कार्यशाळा

कर्जत (प्रतिनिधी) : कृषी विभागाकडून ट्रॅक्टर व इतर औजारे यांना अनुदान दिले जाते. मात्र ट्रॅक्टर व औजाराच्या  किंमती देखील सध्या प्रंचड वाढलेल्या आहेत, मात्र आधीच विविध समस्यांनी ग्रासलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना या पद्धतीने ट्रॅक्टर व औजारे खरेदी करणे जिकिरीचे झाले आहे. हीच अडचण ध्यानात घेऊन कृषी विभागाने भाडेतत्त्वावर औजार बँक ही योजना आणली आहे. आज (शुक्रवारी) तालुक्यातील २७ औजार बँक धारकांची कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सर्व औजार बँक धारकांना या योजने संदर्भात मार्गदर्शन केले. 


आत्मा अतंर्गत शेतकरी गटाना १० लक्ष मर्यादेत ट्रॅक्टर व इतर औजारे खरेदी साठी पुर्व संमती दिली जाते, अशा औजार बँकेस ४.०० लक्ष रु अनुदान कृषी विभागाकडून दिले जाते. या औजार बँक मधील  ट्रॅक्टर व औजारे ही भाडेतत्त्वावर गावातील ईतर शेतकऱ्यांना वापरण्यास देणे अपेक्षित आहे.   ट्रॅक्टर व औजाराचा भाड्याचा दर हा प्रचलीत बाजार दरापेक्षा २०% ने कमी ठेवला जातो. 


औजार बँक मधील औजारांचा लाभ घ्या.

कर्जत तालुक्यात २७ औजार बँकांना आता पर्यंत कृषी विभागाकडून अनुदान देण्यात आलेले आहे. खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकर्यांची शेतीच्या मशागतीसाठी लगबग चालु आहे तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी  आवर्जून या औजार बँक मधील औजारे  कमी दराने भाड्याने घेऊन वापरावीत असे आवाहन कर्जत कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.