कर्जत (प्रतिनिधी) : दारात कचरा का टाकला असे म्हणत शिवीगाळ करत लोखंडी गजाने डोक्याला मारहाण केल्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना कर्जत शहरात घडली आहे, याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील म्हसोबा गेट येथील नय्युम लाला बेग हे त्यांच्या म्हसोबा गेट येथील चिकन दुकानासमोर असताना त्याठिकाणी वसीम उर्फ पाप्या चाँद पठाण तसेच इतर दोन ( सर्व रा. म्हसोबा गेट ता. कर्जत ) हे त्याठिकाणी आले व वसीम पठाण हा बेग यांची पत्नी  व मुलाला माझ्या दारात कचरा का टाकला असे म्हणुन शिवीगाळ करु लागला,  त्यावेळी बेग हे वसीम ला म्हणाले की माझ्या दुकाणाचे पत्र्यावरील कचरा काढत असताना तुझ्या दारात आलेला कचरा मी काढुन घेतो तु शिवीगाळ करु नको, मात्र त्याठिकाणी आलेल्या पठाण यांनी बेग यांना घाण घाण शिवीगाळ केली व वसीम पठाण याने त्याचे हातातील लोखंडी गजाने नय्युम बेग यांच्या डोक्यात मारहाण केली तसेच इतर दोघांनी लाथाबुक्यानी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० कलम ३२३, ३२४, ३४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.