कर्जत (प्रतिनिधी) : मोटरसायकल मिरवणुकीमध्ये घालू नका असे म्हंटल्याचा राग आल्याने एकाने होमगार्ड वर चालू हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजणक घटना काल मिरजगाव येथे घडली आहे, याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की शुक्रवारी १४ एप्रिल रोजी १०.४० वाजण्याचे सुमारास मिरजगाव गावात कमानी जवळ होमगार्ड अमोल रायचंद धांडे हे मिरजगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बंदोबस्त नेमून दिलेले सरकारी काम करत असताना त्याठिकाणी सचिन उर्फ पाप्या बापू गंगावणे , मयूर उर्फ चिंग्या मच्छिंद्र माने (दोन्ही रा मिरजगाव ता कर्जत जिल्हा अहमदनगर) यांनी मिरवणुकीमध्ये मोटारसायकल घालण्याचा प्रयत्न केला असता धांडे यांनी त्यांना सांगितले की, मोटरसायकल मिरवणुकीमध्ये घालू नका त्यामुळे ट्रॅफिक होईल, त्याचा मनात राग धरून आरोपी सचिन गंगावणे याने त्याचे जवळील चाकू धांडे यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली गालावर मारून जबर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे व दोन्ही आरोपींनी होमगार्ड धांडे यांना खाली पडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे, याप्रकरणी फिर्यादी वरून भा दं वि कलम 307, 333, 353, 324, 323, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे हे करत आहेत


