यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी उज्वला गायकवाड , ग्रामपंचायत सदस्य सारिका जाधव , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल जाधव , सचिन साळवे , पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पोकळे नितीन नरुटे , मुख्याध्यापक बापूराव वावगे , शरद सुद्रिक, कर्जत तालुका प्रेस क्लबचे जिल्हा समन्वयक महादेव सायकर , उपाध्यक्ष प्रा . किशोर कांबळे , प्रा . किरण जगताप , प्रा . सोमनाथ गोडसे , मिलिंद राऊत यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी चित्ररंगवा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक केतकी भाऊराव भांगरे १५०१, द्वितीय क्रमांक श्रेया प्रकाश साळवे १००१, तृतीय क्रमांक वेदिका विशालबद्रि काळे ७५१, उत्तेजनार्थ पार्थ विक्रम काळे ५०१ या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले . सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना राशीनच्या सरपंच नीलम साळवे यांच्यावतीने बक्षीस व शालेय साहित्य तर प्रेस क्लबच्या वतीने प्रशस्तीपत्र देण्यात आले .कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. सोमनाथ गोडसे यांनी केले . सूत्रसंचालन मुख्याध्यापक शरद सुद्रिक यांनी केले, आभार महादेव सायकर यांनी मानले .


