कर्जत (प्रतिनिधी) : आशियातील प्रतिष्ठित १८ वी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल व अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोंभळी गावचे सुपुत्र विक्रीकर निरीक्षक प्रदीप सोपान गांगर्डे यांचा नुकताच कोंभळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी कलावंत रघुवीर खेडकर यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला,दरम्यान सुनील खंडागळे, राहुल गांगर्डे, संदीप माकूडे,बबन गांगर्डे, सुभाष गांगर्डे, नितीन गांगर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोंभळी गावचे सुपुत्र विक्रीकर निरीक्षक प्रदीप सोपान गांगर्डे यांनी महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवून अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धा या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत या स्पर्धेत १० किलोमीटर अंतर ३९ मिनिटात पार केल्याबद्दल तसेच मुंबई येथे पार पडलेल्या मुंबई टाटा मॅरेथॉन स्पर्धा ज्यामध्ये 42.2 किलोमीटर अंतर 3 तास 29 मिनिटात पार करून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे, विक्रीकर निरीक्षक पदावर काम करतानाच वयाच्या ४३ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळविले आहे.


