कर्जत(प्रतिनिधी) :  दोन राजे....इथे गाजले कोकण पुण्य भुमिवर !    कायदा भिमाचा.....!   लाल दिव्याच्या गाडीला अशा अनेक सुरेल भिम गितांच्या  मैफिलीने  रुईगव्हाण येथे उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  साजरी होत आहे.

 मंगळवार दि.१८ रोजी ५ ते १२ या वेळेत जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संघर्ष मित्र मंडळ व समस्थ ग्रामस्थ यांच्या वतीने सांगितले आहे.  स्टार प्रवाह टि.व्ही वरील ' 'मी होणार सुपर स्टार'  या शो मधील उपविजेता ठरलेला विनल देशमुख व स्वप्निल पवार यांच्या सुरेल आवाजात या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन केले आहे. तसेच ५ ते ८ या वेळात भव्य मिरवणूक होणार आहे. त्यानंतर ८ ते ९ या वेळेत स्नेह भोजनाचे आयोजन केले आहे. ९:३० ते १२  सुरेल अशी भिम गितांच्या मैफिलीचे आयोजन केले आहे. जयंती निमित्त  रस्त्याने भव्य दिव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संघर्ष मित्र मंडळ व समस्थ ग्रामस्थ रुईगव्हाण यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने या कार्यक्रमाचा परिसरात ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

 

घटनेचे शिल्पकार परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले या महापुरुषांची एकत्र  जयंती साजरी होणार असल्याने गावात आनंदाचे व चैतन्यमय वातावरण तयार झाले असल्याचे संयोजक समितीचे सदस्य उद्योजक लाला रजपुत यांनी सांगितले.