कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील कोंभळी येथील पंचशील मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची 132 वी जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 व्या जयंतीनिमित्त पंचशील मित्र मंडळाच्या वतीने कोंभळी(Kombhali) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये सकाळी ठीक 8.वा ते 9.30 प्रतिमापूजन करण्यात आले, तसेच 9.30 ते 2.00 आरोग्य तपासणी शिबिर (Health check up camp) आयोजित करण्यात आली होती, सायंकाळी 5 वाजता जंगी मिरवणूक (Procession) काढण्यात आली होती.
या मिरवणुकीत आबालवृद्धांसह , पंचशील मित्र मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमपूजन (paganism) करण्यात आले, यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे,(Api Somnath Divate) सरपंच सचिन दरेकर, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष काका गोरखे, माजी सरपंच दिपक गांगर्डे, उत्तम शेलार यांनी मनोगत व्यक्त केले तर सतिष शेलार यांनी आभार मानले. दरम्यान लहान मुलांचे विविध कार्यक्रम याठिकाणी पार पडले.





